Pimpri : भारत विकास परिषदेच्या दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव प्रदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज –  भारत विकास परिषद, दक्षिण पुणे व पिंपरी-चिंचवड शाखा यांनी ( Pimpri) दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव प्रदान शिबिराचे रविवार (दि.14) हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली येथे आयोजित केले ज्याल उत्तम प्रतीसाद मिळाला.

साक्षी मेडटेक अँड पॅनेल्स लिमिटेड आणि स्टार इंजिनीअर्स, पुणे यांनी या सदर शिबिरासाठी भरघोस आर्थिक सहाय्य केले. साक्षी मेडटेक अँड पॅनेल्स लिमिटेडचे ऑपरेशन हेड वर्तक व इतर मान्यवरांच्या हस्ते लाभार्थीना अवयव देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर, चितळे डेअरी, मेसर्स पु ना गाडगीळ, हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली यांनी सह प्रायोजक म्हणुन सहभाग घेतला.

Maharashtra : आरटीईसाठी आजपासून भरता येणार ऑनलाईन फॉर्म

एका कृत्रिम अवयवाची बाजारात किंमत सुमारे 50 हजार रुपये आहे. दिव्यांग लाभार्थीना सदर अवयव कोणताही मोबदला न घेता देण्यात आले. 10 मार्च  रोजी सांगली येथे कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले होते. 161 लाभार्थीनी नोंदणी केली व त्यांचे 173 कृत्रिम अवयव साठी मोजमाप घेण्यात आले.

कृत्रिम अवयव (पाय 138, हात व कॅलिपर 35) बनविण्याचे काम भारत विकास परिषदेच्या विकलांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांनी केले. यावेळी सर्व लाभार्थीनी कृत्रिम अवयव मिळाल्यामुळे समाधान व कृतज्ञता व्यक्त ( Pimpri)  केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.