Pimpri : महापौर आणि आयुक्तांकडून शहीद दिनी क्रांतिकारकांना अभिवादन

एमपीसी न्यूज – शहीद दिनानिमित्त दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या अर्धाकृती पुतळयास महापौर ऊषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसदस्य राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश शर्मा, शिरिष रोच, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवनात भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त केएसबी चौकातील छत्रपती शाहूमहाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मीला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.