Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी-चिंचवड महापालिका, राजकीय पक्ष, विविध संघटनातर्फे अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पिंपरीत भीमसागर लोटला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत – धर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्यलेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी  महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक  नाना काटे, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, सुदाम कदम, विनोद कांबळे, गंगा धेंडे, महंम्मद पानसरे, गोरक्ष लोखंडे,प्रदिप गायकवाड, उत्तम हिरवे, शमीम पठाण, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, ‍दिपक साकोरे, सचिन माने, बाळासाहेब पिल्लेवार, निलेश डोके, दत्तात्रय जगताप, यतिन पारेख, सविता खराडे, संतोष वाघेरे, देवी थोरात, शमा सय्यद, मनोज सुतार, शक्रुल्ला पठाण, अभिजीत आल्हाट, पोपट पडवळ, प्रशांत देवकाते, कविता ताठे, शशिकांत निकाळजे, साउल शेख, आशा शिंदे, सलिम सय्यद, पायल देवकर, रामदास मोरे, सुनिल अडागळे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे व प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष निगार बारस्कर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक मंगल,  श्याम अगरवाल, आयुष मंगल, जयराम शिंदे, दिलीप पांडारकर, हर्षवर्धन पांडारकर,  दीपक थोरात, राजेंद्र लोंढे  , केशव परिहार,  निसार बारस्कर, आबा खराडे, राजेश नायर, मिताली चक्रवर्ति, सुरेश कानितकर,  वैशाली नलगे, जयश्री काननाइके, नवनाथ डेंगळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.