Pimpri : वसंतराव नाईक यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे (Pimpri ) दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता चंद्रकांत कुंभार तसेच सिताराम राठोड, वसीम कुरेशी, बालाजी राठोड, रवी राठोड, रघुनाथ चव्हाण, अंकुश लोहकरे उपस्थित होते.

Akurdi : शाळेच्या कामामुळे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; रुग्णांचे हाल

वसंतराव नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दूरगामी स्वरूपाच्या उपाययोजना राबविल्या. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते. महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषीविषयक कार्याची दखल घेऊन त्यांचा 1 जुलै हा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले असून त्यानुसार हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान करण्यात (Pimpri ) येतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.