Pimpri : ‘स्ट्रेप्टोसायक्लीन’च्या उत्पादनासाठी राबत आहेत HA कंपनीचे योद्धे

Pimpri: 'Hindustan Antibiotics' warriors working for streptocycline production

एमपीसी न्यूज – ‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ हे शेतीसाठी उपयुक्त असणारे व शेतकऱ्यांच्या पसंतीचे प्रभावी व आंतरप्रवाही असे जीवाणुनाशक प्रतिजैविक असून विविध पिकांसाठी या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या मागणीचा पुरवठा करण्यासाठी कोरोनासंसर्गातही पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (HA) कंपनीतून शेतीसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा अखंड सुरू आहे. 

द्राक्षे, डाळिंब, मिरची, टोमॅटो, काकडी, कांदा, वांगी, कापूस , भात, बटाटे, लिंबूवर्गीय फळे, सोयाबीन, केळी, आंबा, सफरचंद, नारळ, सुपारी व मका यासाठी हे औषध वापरले जात आहे. पानांवरील डाग, करपा, पातीवरील मर घालून फवारणी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच बियाणावर प्रक्रिया व  रोपे बुडून ठेवण्यासाठी हे कीटकनाशक उपयुक्त आहे. ‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ प्रतिजैविक हे अनेक पिकांच्या जीवणूजन्य रोगांच्या बंदोबस्तासाठी आहे.

‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ हे रोगप्रतिकारक व रोगप्रतिबंधक दोन्हीसाठी महत्वाचे आहे. त्याव्यतिरिक्त  गेल्या दोन महिन्यांपासून औषध निर्माण, कृषी उत्पादन, वितरण हे विभाग देखील आपकी भूमिका बजावत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असला तरी पुढच्या महिन्यापासून पेरणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. पेरणीपूर्वी शेतीची मेहनत शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे शेतकरी आतापासूनच आवश्यक गोष्टींची जमवाजमव करत आहेत. ऐन पेरणी वेळी गडबड नको म्हणून ‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ हे प्रतिजैविकांची मागणी वाढली आहे, ही मागणी पूर्ण करण्यासाठी HA कंपनीचे अनेक कामगार मेहनत घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.