Pimpri : संभाजी ब्रिगेडच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने थेरगाव येथे अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

या वेळी राजेश्वरी जाधव या लहान मुलीने सावित्रीबाईंची वेषभूषा करून आपल्या बोबड्या शब्दात सावित्रीबाईंच्या आठवणी जागवल्या तसेच यावेळी सावित्रीबाईंच्या जीवनाचा खडतर प्रवास व्याख्याते अरविंद वाघमारे यांनी उपस्थितांना आपल्या शब्दात सांगितला.

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी महापुरूषांच्या जीवन कार्याबद्दल मार्गदर्शन केले. शहर कार्याध्यक्ष वैभव जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी केले. या कार्यक्रमाला सुभाष जाधव. विनोद घोडके, शिवनाथ दिलपाक, सुमित वाघमारे, भैय्यासाहेब गजधने, अंतिम जाधव आदींसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मिठाई तसेच क्रांती ज्योती साविञी या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.