Pimpri: टाटा मोटर्सची माणुसकी! हजारो गरजूंना रेशन, भोजन, डॉक्टरांना दिले ‘पीपीई’ कीट

दररोज 1,300 हून अधिक नागरिकांना दिल्या जात आहेत विविध सुविधा

एमपीसी न्यूज – समुदायामधील सदस्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारण्‍याप्रती कटिबद्धता कायम राखत टाटा मोटर्स या देशातील अग्रणी ऑटोमोबाईल उत्‍पादक कंपनीने लॉकडाऊनदरम्‍यान समुदायाच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी विविध उपाय हाती घेतले आहेत. दररोज 1.300 हून अधिक समुदायांसाठी सुविधा दिल्या जात आहेत. आतापर्यंत 17 हजार 550 हून अधिक गरम शिजवलेल्‍या भोजनांची सोय केली आहे. दररोज 19 पोलीस ठाण्यात सुरक्षित व शुद्ध पिण्‍याचे पाणी दिले जाते. 1100 हून अधिक कुटुंबांना रेशन किट्स देण्‍यात आले आहेत. ते कीट तीन आठवड्यांपर्यंत साडेपाच हजार व्‍यक्‍तींसाठी  पुरू शकते. बीजे मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल्‍स आणि वायसीएम हॉस्पिटलला पर्सनल प्रोटेक्टिव्‍ह इक्विपमेंट (पीपीई) कीट देखील दिले आहेत.

सध्‍याच्‍या संकटाचे निराकरण करण्‍याच्‍या कंपनीच्‍या धोरणाशी बांधील राहत पुणे प्‍लांटमधील कर्मचा-यांनी समुदायाच्‍या भल्‍यासाठी सेवा देणा-या उपक्रमांप्रती स्‍वत:ला झोकून दिले आहे. प्‍लाण्‍टने  कंपनीच्‍या ई 3 मार्गदर्शक सूचनांना अनुसरून उपायांची अंमलबजावणी केली आहे.

आवश्‍यक वस्‍तू पुरवठा तरतूद

टाटा मोटर्सने स्‍थलांतरित व अडकून पडलेले समुदाय, शहरी झोपडपट्टीमधील निवासी, संक्रमण शिबिरे आणि प्रांतातील गावांमधील लोक, ड्रायव्‍हर्स, सह-ड्रायव्‍हर्स, मेकॅनिक्‍स, कंत्राटदार व तात्‍पुरते मजूर, सुरक्षा कर्मचारी यांच्‍यासाठी अन्‍न पुरवठ्याची व्‍यवस्‍था केली आहे. कंपनीने ड्रायव्‍हर्स, मेकॅनिक्‍स व कंत्राटदार कामगारांना दररोज 2300 हून अधिक शिजवलेले भोजन दिले आहे. कंपनीने आतापर्यंत 17 हजार 550 हून अधिक नागरिकांना शिजवलेले भोजन देण्‍यासोबत 1100 हून अधिक कुटुंबांना रेशन किट्सचे वाटप केले आहे. याव्‍यतिरिक्‍त कंपनीने दररोज 19 पोलीस ठाण्यांना 250 लीटरहून अधिक सुरक्षित व शुद्ध पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे. या वाटप प्रक्रियेदरम्‍यान सोशल डिस्‍टन्सिंग नियमांचे पालन केले जात आहे.

प्रादुर्भाव न वाढवता ख-या हिरोंसाठी सुविधा

टाटा मोटर्सने हॉस्पिटल्‍स, विक्रेते, आरोग्‍य कर्मचारी, सेना कर्मचारी, पोलिस स्‍टेशन्‍स, वन विभाग अधिकारी आणि पुणे प्‍लाण्‍ट परिसराभोवती असलेले समुदाय यांना पीपीई, सॅनिटायझर्स व मास्‍क्सचे वाटप केले आहे. बीजे मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल्‍स व वायसीएम हॉस्पिटल यांना पीपीईंची सुविधा देत आहे. आतापर्यंत कंपनीने 150  पीपीई युनिट्स, 13 हजार 500 एन-95 मास्‍क्स, 36 हजार डिस्‍पोजेबल मास्‍क्स, एक हजार सॅनिटायझर्स आणि पाच हजार लिटर्स सोडियम हायड्रोक्‍लोराईडचे वाटप केले आहे.

नियंत्रण व प्रतिबंधासंदर्भात लोकांना माहिती

टाटा मोटर्स उत्तम आरोग्‍य पद्धतींवर भर देत आहे. त्‍या उद्देशाने कंपनी झोपडपट्टीमधील रहिवाशी आणि कंत्राटदार कामगार, पुरवठादार व कमी उत्‍पन्‍न असलेल्‍या समुदायांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी बॅनर्स व इतर संबंधित माहितीफलक उभारत आहे. कंपनी आपल्‍या सोशलमीडिया व्‍यासपीठांच्‍या माध्‍यमातून देखील संसर्गापासून अप्रभावित आणि आरोग्‍यदायी राहण्‍यासाठी अवलंबता येणारी सुलभ व सोप्‍या खबरदारी उपायांबाबत जागरूकतेचा प्रसार करत आहे.

या उपक्रमांबाबत बोलताना टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, ”टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही संपूर्ण टाटा ग्रुपने आमच्‍या कॉर्पोरेट अजेंडाच्‍या मूलभूत बाबींमध्‍ये सामुहिक आरोग्‍याचे तत्त्व आत्‍मसात केले आहे. जग अनपेक्षित संकटाचा सामना करत आहे आणि कंपनी गरजवंतांना साह्य करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. कंपनी सरकारच्‍या प्रयत्‍नांना पाठिंबा देण्‍यासोबत या महामारीचा सामना करणा-या हिरोंना पाठिंबा देण्‍याचे कार्य सुरूच ठेवेल. आमचा दृढ विश्‍वास आहे की, सहयोगात्‍मक प्रयत्‍न आपल्‍याला या संकटामधून लवकरात-लवकर बाहेर पडण्‍यामध्‍ये मदत करतील”.

टाटा मोटर्सच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.