Pimpri : अॅड. जया उभे यांना मानव विकास सन्मान पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – लातूर जिल्ह्यातील गुरधाळ येथील मानव विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे दिला जाणारा ‘मानव विकास सन्मान’ डॉ. अॅड. जया उभे यांना जाहीर झाला. एक सप्टेंबर रोजी लातूर येथील दयानंद सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

मानव विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी समाजात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना मानव विकास सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. संस्थेने जया उभे यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर केला. त्याबाबतचे पत्र संस्थेच्या अध्यक्षा सरोजा वसंत घोगरे-पाटील यांनी कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.