Pimpri : निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा भाविकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – मच्छिंद्र तापकीर सोशल फौंडेशनच्या वतीने गुरुवारी (दि. 13) रोजी तापकीरनगर येथे कै. लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो नागरिकांनी या कीर्तन सोहळ्यास हजेरी लावली.

यावेळी नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, स्वीकृत नगरसदस्य विनोद तापकीर, देविदास पाटील, सागर तापकीर, हरेश तापकीर, मच्छिंद्र तापकीर, संतोष बारणे, सचिन चिखले, देवा अप्पा नखाते, विनायक मोरे, सुखदेव मोरे, नवीन तापकीर, विकास लांडे, अंकुश राजवाडे, सुदाम कापसे, गरड गुरुजी, मानकर स्वामी, संदीप पवार आदी उपस्थित होते.

काळेवाडी तापकीर नगर येथील लक्ष्मी निवास, मच्छिंद्र तापकीर यांच्या बंगल्याशेजारी सायंकाळी सहाच्या सुमारास कीर्तनास सुरुवात झाली होती. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तसेच शुक्रवारी सायंकाळी 10 ते 12 वा. ह.भ.प. राधाकृष्ण गरड (गुरुजी) यांचे संगीत भजन रजनीचा कार्यक्रम झाला. पुण्य स्मरणानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.