Sangvi : पिंपळे गुरव येथे दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – कपडे खरेदी करण्यासाठी घरातील लोक बाहेर गेले असता चोरट्यांनी घरफोडी करत घरातील तब्बल 1 लाख 58 हजारांचा ऐवज चोरला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे शुक्रवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास घडली.

सुधाकर रावसाहेब पवार (वय 48, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर हे पत्नी सोबत कपडे खरेदीसाठी पिंपरी येथे गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरात लोखंडी कपाटात व लाकडी ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सुधाकर कपडे खरेदी करून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलीस उपनिरीक्षक एस जी पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.