Pimpri : संघटन वाढीसाठी एकजुटीने  काम करू – अमित गोरखे  

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे.  सर्व कार्यकर्ते यांच्यामधील मैत्री भाव अधिक दृढ व्हावा यासाठी टिफिन बैठक घेतली (Pimpri) जात आहे. टिफिन बैठक ही पारिवारिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम आहे. संघटन वाढीसाठी एकजुटीने  काम करूयात असे आवाहन भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख  अमित गोरखे यांनी केले.

Pimpri : स्वतःला विसरल्याखेरीज नवनिर्मिती अशक्य – बशीर मुजावर

पिंपरी विधानसभा भाजपा कार्यकर्ते यांची टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती. नगरसेवक शीतल शिंदे यांनी उत्तम नियोजन केले होते.  येणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी भाजपाने महाविजयाचा संकल्प केला आहे.

पिंपरी विधानसभेत बदलल्या राजकीय समीकरणाचा भाजपा संघटनावर कुठलाही नकारात्मक परिणाम होणार नाही. महाविजयासाठी प्रत्येक बूथ व परिसरातील कार्यकर्ते यांची फळी अधिक सक्षम करावी लागेल.

म्हणून येणाऱ्या दिवसात प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते बैठक  आयोजित केली जाईल. भाजपा संघटन वाढीसाठी एक जुटीने काम केले जाईल अशी माहिती निवडणूक प्रमुख गोरखे यांनी दिली.

प्रदेश प्रमुख व बूथ कार्यकर्ते यांच्यातील संवाद अधिक चांगला व्हावा म्हणून पिंपरी भाजपा संघटन सोशल मिडिया व्यासपीठ तयार केले आहे. या ठिकाणी भाजपा संघटन कार्यकर्ते यांचा कार्य आढावा प्रसिद्ध केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपा हा वैचारिकता व संकृती असलेला पक्ष आहे. देशात जे चांगले बदल अपेक्षित होते ते 2014 निवडणुकी नंतर दिसत आहेत.

त्यामुळे आपल्या पुढील पिढीच्या उत्तम भविष्यासाठी आपणास मोदी  यांना परत पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे.

बदललेल्या राजकीय परिस्थिती मुळे  ज्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी अथवा समस्या झाल्या असतील.

त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे प्रश्न  समजून घेतली जातील अशी माहिती पिंपरी-चिंचवड भाजपा प्रभारी अ‍ॅड. वर्षा डहाळे यांनी सांगितले

यावेळी  आमदार उमा खापरे, भाजपा प्रभारी वर्षा डहाळे, प्रदेश सदस्य  सदाशिव खाडे, सरचिटणीस राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, महेंद्र बाविस्कर,महेश कुलकर्णी, नगरसेवक शीतल शिंदे, शर्मिला बाबर,

मनीषा शिंदे, अनुराधा गोरखे, सुजाता पालंडे, गणेश वाळूंजकर, गणेश ढाकणे, समीर जवळकर, प्रकाश तात्या  जवळकर, जयसिंग पाटील, नंदू कदम,  देवदत्त लांडे,  विद्या भोगले,  संजय भंडारी, विजय शिंदे,

योगेश वाणी, प्रदीप बेंद्रे, खेमराज काळे.,संतोष घनवट,नंदू भोगले, अनघा रुद्र, योगेश लंगोटे, गणेश लंगोटे, रश्मी खंदारे, नारायण चव्हाण, प्रशांत शिंदे, धनंजय खुडे, विशाल वाळूंजकर, योगेश वाणी, मदन गोयल,

गोपाल मंडल, शिवदास हंडे, शुभम पिंपळे, राम बसवणे,  विलास वैद्य, विकाम लामदे, कैलास कुटे, गणेश काळभोर, चंद्रकांत चव्हाण इतर  मोठ्या संखेने कार्यकर्ते व पदाधिकारी (Pimpri)  उपस्थितीत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.