Pimpri: मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (दि.19) होणा-या विधी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून विधीच्या मंजुरीनंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सह शहर अभियंत्याची तीन पदे मंजूर आहेत. स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील आणि विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे अशी दोन पदे भरलेली आहेत. तर, एक पद रिक्त होते. रिक्त पद भरण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे.

पदोन्नती समितीची 4 सप्टेंबर 2018 रोजी बैठक झाली. या बैठकीत निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी विधी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. विधीच्या मान्यतेनंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.