Pimpri : महापौर राहुल जाधव टिपताहेत मिरवणुकीची क्षणचित्रे

एमपीसी न्यूज- चिंचवडच्या चापेकर चौकात पोलिसांच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागतकक्षात महापौर राहुल जाधव छायाचित्रणाचा आनंद घेताना पाहायला मिळाले. मिरवणुकीची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते.

अकरा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज (रविवारी) आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश मंडळांकडून निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी आकर्षक सजावटी केल्या आहेत. दुपारी दोन वाजता चिंचवडमध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. चिंचवड, चापेकर चौकात पोलिसांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गणेश मंडळाचे स्वागत करण्यात येत आहे. याच ठिकाणी बसून महापौरांना मिरवणुकीची क्षणचित्रे टिपण्याचा मोह आवरता आला नाही. आपला कॅमेरा काढत त्यांनी मिरवणूक आपल्या कॅमेऱ्यात टिपली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.