_MPC_DIR_MPU_III

Pimpri : महापौरपद चिंचवडकरांकडे, माई ढोरे, माया बारणे, आरती चोंधे यांच्यात चुरस, संगीता भोंडवे ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद चिंचवडकरांकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. महापौरपदासाठी माई ढोरे, निर्मला कुटे, माया बारणे, आरती चोंधे यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. संगीता भोंडवे ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चिन्हे आहेत. महापौर, उपमहापौरपदासाठी आज (सोमवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. दरम्यान, राज्यात सत्ता नसल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपने नगरसेवकांची बैठक बोलविली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

शहराचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरिता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांची विधानसभा निवडणुकीमुळे मिळालेली मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महापालिका मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापौरपदासाठी सांगवीच्या माई ढोरे, थेरगावच्या माया बारणे आणि पिंपळेनिलखच्या आरती चोंधे यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. तर, रावेतच्या संगीता भोंडवे ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात भाजपची सत्ता नाही. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून भाजपने दुपारी एक वाजता नगरसेवकांची बैठक बोलविली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.