Pimpri: महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख आज (मंगळवारी) सेवानिवृत्त झाले. त्यांच्यासह 22 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.

माहे डिसेंबर 2019 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 22 अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन सत्कार करण्यात आला. मधुकर पवळे सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर उषा ढोरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये पदाधिका-यांबरोबरच अधिकारी व कर्मचा-यांचे योगदानही महत्वाचे आहे. सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा त्यामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज देशमुख, लेखाधिकारी सुरेश इप्पकायल, असिस्टंट मेट्रन रोहिणी गोडसे, मुख्याध्यापक पांडुरंग गायकवाड, वाहनचालक मधुकर केंद्रे, लॅब टेक्नीशियन संजय देठे, सहाय्यक शिक्षक उमा कुलकर्णी, उपशिक्षक सुवर्णा गोसावी, शिपाई मालती कोष्टी, सफाई कामगार अलका ढोबळे, रखवालदार मोहन कदम, रविंद्र सूर्यवंशी, सुभाष नाणेकर, महादेव करंजकर, फायरमन रामदास गाजरे, बजरंग पवार, आया शोभा तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये लेखाधिकारी प्रशांत झनकर, उपलेखापाल सुरेश पंजाबी, गटरकुली लाला वडमारे, विजय शिरसाठ आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.