Pimpri beating case : घरात घुसून मैत्रिणीला मारहाण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : घरात घुसून मैत्रिणीशी वाद घालत तिला मारहाण करणाऱ्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता झाला. (Pimpri beating case)याप्रकरणी पीडितेने सोमवारी (दि.3) पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

PCMC News : यापुढे वर्क ऑडर संगणक प्रणालीद्वारेच तयार होणार; आयुक्तांचा आदेश

उमांश चौधरी (वय23 रा.पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मित्र असून तो परवानगी शिवाय फिर्यादीच्या घरी गेला.(Pimpri beating case) तेथे त्याने फिर्यादीशी वाद घालत चप्पलने मारहाण केली.त्याला फिर्यादीने विरोध केला असता त्याने गैरपद्धतीने अंगाला स्पर्श केला. या झटापटील फिर्यादी जखमी झाल्या असून याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.