PCMC News : यापुढे वर्क ऑर्डर संगणक प्रणालीद्वारेच तयार होणार; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांची सद्य:स्थितीतील देणी आणि भविष्यातील देणी याबाबत अचूक माहिती प्राप्त होत नाही. त्यामुळे संभाव्य खर्चाचे अचूक नियोजन होत नाही, (PCMC News) ही बाब लक्षात घेऊन भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांचे आणि वस्तू व सेवा पुरवठादार यांचे कार्यारंभ आदेश यापुढे संगणक प्रणालीतून तयार करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांचे आणि वस्तू व सेवा पुरवठादार  यांचे कार्यारंभ आदेश जारी केले जातात. परंतु, ही कामे सुरू असताना सद्य:स्थितीतील देणी आणि भविष्यातील देणी याबाबत अचूक माहिती प्राप्त होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

Sai Mandir : विजयादशमी निमित्त साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

त्यामुळे संभाव्य खर्चाचे अचूक नियोजन करणे शक्य होत नाही. महापालिकेची जी देणी आहेत, त्याबाबतची अचूक माहिती मिळणे गरजेचे आहे. (PCMC News) त्यासाठी भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांचे आणि वस्तू व सेवा पुरवठादार यांचे कार्यारंभ आदेश आता संगणक प्रणालीतूनच तयार केले जाणार आहेत. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी परिपत्रकाद्वारे आदेश जारी केला आहे.

भांडवली, महसुली तसेच किरकोळ दुरुस्ती कामांचे आणि वस्तू व सेवा पुरवठादार यांचे कार्यारंभ आदेश संगणक प्रणालीतून तयार करण्यासाठी या प्रणालीमध्ये आवश्यक ती सुधारणा माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत आपल्या विभागाकडून करून घेण्यात यावी.(PCMC News) आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या देण्यांबाबत संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवण्यात यावी. या परिपत्रकाची नोंद सर्व संबंधित विभागांनी घ्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.