BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : आमदार महेश लांडगे यांना ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’

274
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जाहीर झाला आहे. तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

याबाबतची माहिती पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, सल्लागार समितीचे जवाहर चोरगे, अॅड. मंदार जोशी व निखिल निगडे यांनी दिली.

पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे रविवारी (दि. 9) पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी ऑल इंडिया अ‍ॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार श्रीरंग बारणे व पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत.

ज्या व्यक्तींनी संघर्षातून आपले आयुष्य घडवले, अशा व्यक्तिंना पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा पुरस्काराचे आठवे वर्ष असून, खडतर परिस्थितीचा सामना करीत पुढे आलेल्या प्रतिथयश व्यक्तींचा सत्कार करुन युवकांपुढे आदर्श निर्माण करण्याचा उद्देश या पुरस्कारामागे आहे.

या पुरस्कार प्रदान सोहळ्याबरोबरच ‘युवकांच्या मनातील उद्याचा महाराष्ट्र’ या विषयावर राज्यातील युवानेत्यांचा परिसंवाद आयोजिला आहे. या परिसंवादामध्ये राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार संतोष दानवे, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे युवानेते सहभागी होत आहेत. यासह संगीतसम्राट फेम अभिजित कोसंबी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3