Pimpri : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कत्तल करण्यासाठी जनावरांना टेम्पोमधून घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 5) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी पिंपरी पुलावर केली.

मंगेश मछिंद्र नढे (वय 24, रा. नढे नगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अकबर शेरमहमद खान (वय 34, रा. शांती कॉलनी, विजय नगर, काळेवाडी), बाबू उर्फ गुलाम उर्फ जिलानी मोहम्मद हुसेन कुरेशी (वय 18), अतुल प्रकाश भोटे (वय 26) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका टेम्पोमध्ये (एम एच 11 / सी एच 0818) एक गाय आणि एक वासरू कत्तल करण्यासाठी बेकायदेशीररित्या घेऊन जात होते. हा टेम्पो पिंपरी पुलावर आला असता पोलिसांनी टेम्पो चालकाला टेम्पोमधील जनावरांच्या खरेदी विक्रीच्या पावत्यांबाबत विचारले असता त्याच्याकडे याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी 20 हजार रुपये किमतीची जनावरे आणि तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 3 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.