Pimpri : पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
रुदळ प्रभाकर फाळके (वय 21), अरविंद उर्फ सोन्या रमेश काळे (वय 19), विशाल विष्णू लष्करे (वय 22, सर्व रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह आयुष निंबाळकर (रा. मोहननगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष बाबू खोकर (वय 40, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष यांचे आरोपींसोबत मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून बुधवारी रात्री आरोपींनी संतोष यांना मारहाण केली. काही वेळाने पुन्हा कोयते व लोखंडी रॉड घेऊन आले. रुदळ याने संतोष यांच्या डाव्या हातावर वार केला. विशाल याने संतोष यांचा मित्र प्रति ढोरमले यांच्या छातीवर व हातावर जखम केली. सोन्या काळे याने संतोष आणि प्रति या दोघांना मारहाण केली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.