Pimpri : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने पायी चालत जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री साडेआठ वाजता क्रोमा मॉलजवळ नेपाळी मार्केट समोर पिंपरी येथे घडली.

बिंदरसिंग सुरजितसिंग चौहान (वय 64, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा गुरूमिनसिंग बिंदरसिंग चौहान (वय 24) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार नीरज विश्वकर्मा (वय 24, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजता बिंदरसिंग पिंपरी येथील क्रोमा मॉल जवळ नेपाळी मार्केटच्या समोरील रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी नीरज दुचाकीवरून (एम एच 12 / एल ई 6024)  भरधाव वेगात आला. त्याने बिंदरसिंग यांना जोरात धडक दिली. यामध्ये बिंदरसिंग यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बिंदरसिंग यांचा मृत्यू झाला. या अपघातात नीरज हा देखील जखमी झाला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.