Pimpri: महापालिका एक कोटी रुपयांचे जंतूनाशक खरेदी करणार; स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना कोविड १९ या प्रादुर्भाव नियंत्रणच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ब्याक्टोडेक्स हे जंतूंनाशक खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्‍या १ कोटी ३७ लाख, वायसीएम रुग्णालयासाठी २ नग सोनोग्राफी कलर डापलर उपकरण खरेदीसाठी येणार्‍या ८८ लाख ६७ हजार खर्चासह शहरात करण्यात येणा-या इतर विविध विकास कामांसाठी येणार्‍या एकूण ९ कोटी १ लाख इतक्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (सोमवारी) मान्यता देण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. भारतीय साथरोग नियंत्रण कायदा अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ६३(६) व कलम ६७(३) नुसार कोरोना विषाणूचा कोरोना कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी आवश्यक स्टेरिजनसी हे जंतूंनाशक सोल्यूशन थेट पध्दतीने खरेदी करण्यात येणार आहे.

त्याकामी येणार्‍या ५६ लाख २५ हजार, आरोग्य व इतर विभागांसाठी सॅनिटायझर खरेदी ५० लाख ५० हजार इतक्या, शहरातील नागरिकांना कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पदाधिकार्‍यांमार्फत वाटप करण्यासाठी आवश्यक १ लाख सॅनिटायझर खरेदी करणे २५ लाख इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महानगरपालिकेच्या विविध रुग्णालायांसाठी कोरोना आयसोलेशन वार्डसाठी आवश्यक उपकरणे, साहित्य खरेदीसाठी येणार्‍या ९५ लाख ९१ हजार, लाइबॉय साबण खरेदी ३२ लाख २७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र १ चिखली येथील नेवाळेवस्ती पंप हाऊस परिसरात जल:निस्सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणार्‍या ६२ लाख ३३ हजार , प्रभाग क्र.२८ मधील विश्वशांती कॉलनी, गावठाण परिसर, शिवराजनगर, रहाटणी व इतर परिसरात जल:निस्सारण विषयक सुधारणा कामे करणेकामी येणार्‍या ४५ लाख ७५ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

थेरगाव गावठाण,थेरगाव स.न.९ थेरगाव लक्ष्मणनगर, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टरपंप व पुनावळे येथील पंप हाऊसचे चालन करणे या कामास ०१ मे २०२० पासून ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे. त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालानासाठी ३३ लाख ९ हजार, सांगवी गावठाण,सांगवी पी.डब्लु.डी सांगवी,स.न.८४,पिंपळे गुरव व दापोडी येथील शुद्ध पाणीपुरवठा करणार्‍या पंप हाऊसचे चालन करणे या कामास दि.०१/०५/२०२० पासून दि.३१/१०/२०२० पर्यंत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे. त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालानाचा खर्च ३२ लाख ८७ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

कृष्णानगर , स.न. २२, पाटीलनगर, जाधववाडी,से.न.१० व गवळीमाथा येथील पंप हाऊसचे चालन करणे या कामास दि.०१/०५/२०२० पासून दि.३१/१०/२०२० पर्यंत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे व त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालनाचा खर्च र.रु.३१ लाख ९६ हजार , रहाटणी, स.न. ९६, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली व बोपखेल येथील पंप हाऊसचे चालन करणे या कामास दि.०१/०५/२०२० पासून ३१/१०/२०२० पर्यंत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे व त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालानाचा खर्च र.रु.२६ लाख १८ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.