Pimpri: शास्तीकर बाधितांचा उद्या महापालिकेवर मोर्चा; नोटीसांची करणार होळी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामावरील शास्तीकर बाधितांनी महापालिकेविरोधात एल्गार पुकारला आहे. शास्तीकराच्या विरोधात उद्या (गुरुवारी) महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयासमोर नोटीसांची होळी केली जाणार आहे.

आकुर्डीतील खंडोबा मंदीरापासून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. काळभोरनगर, चिंचवड, मोरवाडीमार्गे मोर्चा महापालिकेवर धडकणार आहे. महापालिका मुख्यालयासमोर शास्तीविरोधी कृती समितीच्या वतीने शास्तीच्या नोटीसांची होळी केली जाणार आहे.

  • शहरातील नागरिकांना अवैध बांधकामापोटी महापालिका प्रशासनाकडून आठ लाखांपासून 80 लाखांपर्यंतच्या शास्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शास्तीकराच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे, शास्तीविरोधी कृती समितीच्या पदाधिका-यांनी सांगितले. शास्तीकर बाधित नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.