Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसचा भोसरीत मंगळवारी जाहीर मेळावा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 5) जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते येणार असून भोसरी मधील गावजत्रा मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेळाव्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर हा पहिला जाहीर मेळावा असून कोल्हे यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून पाहिले जात आहे.

  • 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने आपल्या जाहिरनाम्यातून अनेक आश्वासने दिली होती. मात्र, निवडून आल्यानंतर त्या सर्व आश्वासनांचे चुनावी जुमले झाले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे.

वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, हमीभाव, पेट्रोल, डिझेल, गॅस ची दरवाढ, वाढती गुन्हेगारी यांसारख्या अनेक विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन, जन हाहाकार आंदोलन, जबाब दो आंदोलन, निर्धार परिवर्तन यात्रा अशा अनेक आंदोलनांमधून सरकारला जाब विचारला आहे. भोसरी येथील सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही वाघेरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.