Pimpri News : मेडीकल गॅस लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 5 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी, जिजामाता, थेरगांव व आकुर्डी रुग्णालयाकरीता रुग्णांच्या उपचाराकरीता आवश्यक द्रव ऑक्सिजन आणि मेडीकल गॅस लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्याकामी येणा-या 5 कोटी रुपयांसह शहरातील विविध विकास कामांच्या येणा-या आणि झालेल्या सुमारे 79 कोटी 12 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने आज (बुधवारी) मान्यता दिली.

शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड पॅकेज क्र.7 अ मधील इमारतींची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण कामांची दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या 4 कोटी 19 लाख, क प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणा-या 33 लाख 77 लाख, ब क्षेञीय कार्यक्षेञातील प्रभाग क्र.17,22 मधील शौचालय/मुतारी 110 सिट्सची मनुष्यबळ व यांत्रिकी पध्दतीने तसेच आवश्यक रसायने वापरून दिवसातून 4 वेळा साफसफाई करणेबाबत येणा-या 53 लाख 54 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

ब क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र.16 तसेच प्रभाग क्र.18 मधील शौचालय आणि मुतारी मनुष्यबळ व यांत्रिकी पध्दतीने तसेच आवश्यक रसायने वापरुन साफसफाई करणेबाबत अनुक्रमे 81 लाख आणि 1 कोटी 9 लाख अशा एकूण 1 कोटी 90 लाख, प्रभाग क्र.6 मधील सद्गुरु नगर, लांडगे वस्ती, महादेव नगर व परिसरात स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करण्याकामी येणा-या 37 लाख 8 हजार इतक्या खर्चास, पालिकेच्या विविध विभागांसाठी, वैद्यकिय विभाग, विविध रुग्णालये यांचेसाठी नियमितपणे दैनंदिन कामकाजासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार तसेच मागणीनुसार करावयाच्या छपाई साहित्याच्या कामासाठी येणा-या 60 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पिंपळे निलख आरक्षण क्रमांक 398 येथे उद्यान विकसित करण्याकामी येणा-या 57 लाख 68 हजार, चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.19 मधील संतोषनगर, दळवीनगर, विजय नगर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी येणा-या 39 लाख 23 हजार, प्रभाग क्र. 22 मधील काळेवाडी, आदर्श नगर, पवनानगर व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या 29 लाख 40 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.