Prakash Javadekar Resign : प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा

एमपीसीन्यूज : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज दिल्लीत विस्तार झाला. मात्र, नव्या मंत्र्यांच्या नावांपेक्षा राजीनामा देणाऱ्या नावांची देशभरात जोरदार चर्चा झाली. राजीनामा देणाऱ्या मंत्रांमध्ये महाष्ट्रातील पुण्याचे प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, आज राष्ट्रपती भवनात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांचा समावेश आहे.

नारायण राणे यांना कॅबिनेट, तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अचानक राजीनामा सत्र सुरू झाल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. कारण अनेक कॅबिनेट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, यात तब्बल बारा मंत्र्यांचा समावेश आहे.

सुरुवातीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांचेही राजीनामे आले. त्यानंतर आता केंद्रीय माहिती व प्रसारण आणि अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनीही राजीनामा दिला.

दरम्यान, या सर्व मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.