Pimpri : देशाचा विकास फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांमुळेच :-वसंत लोंढे

एमपीसी न्यूज – क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना गुरु मानून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व जनतेसाठी संविधान लिहिले. या संविधानाचा व घटनेचा आदर राखूनच भारत जगातील  प्रथम क्रमांकाचे लोकशाही राष्ट्र ठरले आहे. स्वातंत्र्य काळापासून 21व्या शतकापर्यंत देशाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील विकास हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांमुळेच झाला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष व  ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे यांनी केले.

मंगळवारी पिंपरीतील महात्मा जोतिबा फुले स्मारक येथे ओबीसी संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. या वेळी पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक संतोष लोंढे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, सतीश दरेकर, बन्सी पारडे, घनशाम खेडकर, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, महाराष्ट्र माळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विश्वस्त काळूराम गायकवाड आदी उपस्थित होते.

या वेळी सदाशिव खाडे व वसंत लोंढे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिका-यांचा पत्र देऊन सत्कार करण्यात आला. ओबीसी संघर्ष समितीचे कार्यकारिणी पुढील प्रमाणे : उपाध्यक्ष : प्रदीप पवार, महेश भागवत, गणेश वाळुंजकर, अजय जाधव, भिकाजी भोज; सरचिटणीस : वैजनाथ शिरसाट; चिटणीस : संतोष भालेकर, अरुण कांबळे, नंदाताई करे, अरुणा कुंभार, संजय धाडगे; खजिनदार : ईश्वर कुदळे; प्रवक्ता : सुरेश गायकवाड; प्रसिध्दी प्रमुख : अतुल क्षीरसागर; कार्यकारणी सदस्य : विवेकानंद सुतार, अशोक मगर, पुंडलिक सैदाने, राजकुमार परदेशी, सुखदेव खेडकर, सदानंद माने, विलास गव्हाणे, सुर्यकांत ताम्हाणे, विश्वास राऊत, अनिल साळुंके, प्रदीप दर्शिले, शिवाजी अडसुळ, मनोहर कानडे, विष्णु बनकर, अमर ताजणे, गणेश ढाकणे, नाना मंदिलकर, बन्सी पारडे, ज्ञानेश्वर मोंढे, चतुर आहेर, प्रकाश निळकंठ, नारायण भागवत, नवनाथ कुदळे; कायदेशीर सल्लागार : अँड. रवींद्र कुदळे, अँड.बी एम ठोंबरे, संघटक: नेहुल कुदळे, घनशाम खेडकर, विशाल जाधव, प्रताप गुरव, चंद्रकांत डोके, हनुमंत माळी, ज्ञानेश्वर भूमकर; सल्लागार : सदाशिव खाडे, वसंत लोंढे, सतिश दरेकर, संतोष लोंढे, काळुराम गायकवाड, सुरेश म्हेत्रे, कांतीलाल भुमकर, चेतन भुजबळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.