Pimpri News : पुण्यापाठोपाठ पिंपरीतही ‘रॅपीडो’ला परवानगी नाहीच

एमपीसी न्यूज – ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रॅपीडो) कंपनीने (Pimpri News) पिंपरी-चिंचवड शहरात बाईक-टॅक्सीवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी आरटीओकडे ॲग्रिग्रेटरचा परवाना मिळावा म्हणून केलेला अर्ज नाकारला आहे. त्यामुळे रॅपीडोला पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही बाइक टॅक्‍सी चालवता येणार नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीओ) बैठकीत हा अर्ज नाकारण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आरटीओची बैठक पार पडली. या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांच्यासह प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्याचा कायदा, यापूर्वी अशा प्रकारे कोणाला परवानगी दिली आहे का? तसेच रॅपीडो कंपनीचा अर्ज आणि कागदपत्रे याचा विचार करून त्यांची परवानगी नाकारण्यात आली. ही माहिती आरटीओने प्रशासनाने दिली. तसेच नागरिकांनी आपली वाहने रॅपिडो ऍपवर (Pimpri News) वापरास उपलब्ध करुन देऊ नयेत. शिवाय, प्रवाशांनी रॅपिडो ऍपचा वापर करू नये, असे आवाहन आरटीओने केले आहे.

Chikhali : चिखली, मोशीमध्ये घरफोडीत चार लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, ”शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाइक टॅक्‍सी प्रकारची कोणतीही योजना अद्याप राबविलेली नाही. तसेच बाइक टॅक्‍सी प्रकारचे लायसन्स जारी केलेले नाही. बाइक टॅक्‍सीबाबत भाडेतत्त्वाचे धोरण अस्तितवात नाही. रॅपीडो कंपनीकडून कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्यामुळे आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे ऍग्रिगेटर लायसन्स देता येणार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.