Chinchwad News : काकडा आरती कार्तिक स्नान सोहळ्यासाठी परवानगी द्या ; पिंपरी चिंचवड वारकरी महामंडळाची मागणी

एमपीसीन्यूज : महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा प्राण असलेली ‘काकडा आरती कार्तिक स्नान सोहळा 2020’ येत्या 31 ऑक्टोबर पासून सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांच्या वतीने सहपोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी स्वीकारले. तसेच अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसिलदार गीता गायकवाड यांनाही निवेदन देण्यात आले. हा सोहळा कोरोना संकटाच्या नियमांचे पालन करून साजरा केला जाईल, अशी ग्वाही महामंडळाच्यावतीने निवेदनात देण्यात आली आहे.

यावेळी वारकरी संप्रदायाचे पुणे जिल्हा अध्यक्ष हभप सतिश महाराज काळजे, पुणे महानगर अध्यक्ष हभप चंद्रकांत महाराज वांजळे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजय जगताप, पिंपळे सौदागर भजनी मंडळ अध्यक्ष हभप संजय भिसे, पश्चिम महाराष्ट्र वारकरी अध्यक्ष जीवन खाणेकर, पिंपरी चिंचवड ब प्रभाग अध्यक्ष हभप सुरेश भोईर, संतसेवक हभप वसंतदादा कलाटे, माजी नगरसेवक जयंत बागल, हभप जालिंदर काळोखे, हभप धोडिंबा भोंडवे, हभप प्रमोद पवार, हभप विकास काटे, हभप विजय गायकवाड, हभप कैलास काताळे, हभप श्रीधर वाल्हेकर आदींसह पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळी उपस्थित होते.

दरम्यान, वारकरी संप्रदायाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.