Pimpri News : रस्ता ओलांडणाऱ्या 85 वर्षीय आजोबांचा बुलेटच्या धडकेत मृत्यू

पोलिसांनी आरोपीला अटक केली  आहे. 

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडताना 85 वर्षीय आजोबांना एक बुलेटची धडक बसली. त्यात गंभीर जखमी झालेल्या आजोबांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.3) सायंकाळी सहाच्या सुमारास चिंचवड येथील एम्पायर इस्टेट समोर, हनुमान मंदिराजवळ घडली.

बाळासाहेब दादाराव घवले ( वय. 85 ) असे अपघातात मृत झालेल्या आजोबांचे नाव आहे.

याप्रकरणी दीपक श्रीधर शिंदे ( वय. 28, रा. पाढंरकर चाळ, आकुर्डी ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी बुलेट चालक आरोपी अजिज जाकीर हुसेन भोहरी ( वय. 35, रा. कोंढवा खुर्द, पुणे ) याला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब घवले हे चिंचवड येथील एम्पायर इस्टेट समोर, हनुमान मंदिराजवळ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी एक बुलेटची (एमएच 12 एलआर 3752) त्यांना धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या घवले यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.