Pimpri News : भाजपा उत्तर भारतीय आघाडी प्रदेश महिला मोर्चा प्रमुखपदी प्रा. संजीवनी पांडे

एमपीसीन्यूज : भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रमुखपदी पिंपरी-चिंचवड येथील प्रा. संजीवनी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाण्डेय यांनी पांडे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

संजीवनी पांडे यांचे सासर उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील आहे. त्यांचे सासरे वाराणसीच्या डीएलडब्ल्यू (रेल्वे) येथून इंजीनियरिंग सर्विसेसमध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून निवृत झाले आहेत. त्यांचे पती इंन्द्रभुषण पांडे हेही अभियंता आहेत. त्या स्वतः अभियंता असून नामांकित कंपन्यांमध्ये टॉप मॅनेजमेंट स्तरावर कार्यरत होत्या.

सध्या त्या चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये ‘एमबीए’च्या फॅकल्टी आहेत. यापूर्वी त्या एका सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होत्या. त्या अनुषंगाने त्यांचा राज्यभर प्रवास व कार्यकारिणी आहे.

लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीयांसाठी त्यांनी केलेल्या मदत कार्याची भाजपने दखल घेतली आहे. पांडे यांचा महाराष्ट्राशिवाय संपूर्ण उत्तर भारत, दिल्ली, पंजाब, बिहार, बंगाल येथे दांडगा जनसंपर्क आहे.

बिहार निवडणुकीवेळीही भाजपाच्या उत्तर भारतीय सेलने दिलेली जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली. या आधी त्यांनी उत्तर भारतीय आघाडीमध्ये प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या सर्व जमेच्या बाजू बघता पक्षाने त्यांना परप्रांतीय महिला संघटन सक्षम करण्याची जबाबदारी त्यांना दिली आहे.

नियुक्तीनंतर प्रा. संजीवनी पांडे म्हणाल्या, ”पक्षाने दाखविलेल्या या दुहेरी विश्वासाने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. एक जबाबदारी माहेरची व दूसरी जबाबदारी सासरची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उत्तर भारतीय आघाडीचे सर्व महामंत्री यांची मी आभारी आहे. या नियुक्तीसाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची मोठी मदत झाली. त्यांचीही मी आभारी आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.