Pimpri News : दुकानदारी बंद झाल्याने प्राधिकरण विलीनीकरणाला भाजपचा विरोध; राष्ट्रवादीचा पलटवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करताना विकसित भागाचा महापालिकेत समावेश केला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वसमावेशक निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्राधिकरणातील दुकानदारी बंद झाल्याने भाजपकडून विलीनीकरणाच्या निर्णयावर टीका व विरोध केला जात असल्याचा पलटवारही राष्ट्रवादीने केला.

प्राधिकरणाच्या विलीनीकरणाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे. तर, महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने विरोध केला आहे. विविध आरोपी करत या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा भाजपाने काल पत्रकार परिषद घेऊन दिला होता. त्यांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवारी) प्रत्युत्तर दिले.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधीपक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे यावेळी उपस्थित होते.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, सत्ता असताना भाजपला जनहिताचा निर्णय घेता आला नाही. महाविकास आघाडीने जनतेचे हित लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. विकसित क्षेत्र महापालिकेकडे असणार आहे. चांगला निर्णय घेतल्याने भाजपला त्रास होत असल्याचा आरोप लांडे यांनी केला.

मंगला कदम म्हणाल्या, प्राधिकरणात कोणाची दुकानदारी होती. ते सर्वांना माहित आहे. ती बंद झाल्याने टीका केली जात आहे.

प्रशांत शितोळे म्हणाले, प्राधिकरणाच्या विषयावर विरोधक राजकारण करीत आहेत. आमच्याकडून आणि काँग्रेसकडून विरोधी पक्षात गेलेत. त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची सत्ता असताना का निर्णय घेतला नाही.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, श्रेय मिळाले नाही, म्हणून टीका करणे अयोग्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.