Pimpri News: वंचित बहुजन आघाडी करणार ‘दे टक्का’ आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत आहे. निविदा रकमेच्या 30 ते 40 टक्के कमी दराने ठेका घेऊन कामे कशी केली जातात? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडी उद्या (गुरुवारी) महापालिकेसमोर ‘दे टक्का’ आंदोलन करणार आहे.

वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने गुरुवार दुपारी दोन वाजता महापालिका प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर आंदोलन केले जाणार आहे.

बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. निविदा रकमेच्या 30 ते 40 टक्के कमी दराने ठेका घेऊन कामे कशी केली जातात?, महापालिका प्रशासनातील अधिकारी व ठेकेदार यांचे काही संगनमत आहे का?

बोगस एफडीआर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी. अधिकारी व ठेकेदार यांची नार्को टेस्ट करून त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी. अशा विविध मागण्यासाठी ‘दे टक्का’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महासचिव राहिम सय्यद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.