Pune Crime News : धायरीत डॉक्टर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसीन्यूज : पुण्याच्या धायरी परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टर तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ही घटना घडली.

रुपेश सुरेश पाटील (वय 31) असे या डॉक्टर तरुणाचे नाव आहे.

धायरी परिसरात रुपेश पाटील यांचा छोटा दवाखाना होता. परंतु, दवाखाना व्यवस्थित न चालल्यामुळे त्यांनी लॉकडाऊनपूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्या व्यवसायात ही आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

19 डिसेंबरला रुपेश पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचे घर बंद असल्याने शेजार्‍यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सिंहगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.