Dehuroad News : मामुर्डी येथे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या जलवाहिनीतून पाणी गळती

माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार; प्रश्नाकडून उद्या दुरुस्तीचे आश्वासन

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीतून मामुर्डी येथे पाणी गळती होत आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याने कॅंटोन्मेंट प्रशासनाकडे केली होती. त्याची तात्काळ दखल घेत उद्या ( गुरुवारी) या जलवाहिनीची दुरुस्तीचे हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मामुर्डी येथील मुख्य रस्त्यालगत मीना बिल्डींग समोर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीतून अनेक दिवसांपासून पाणी गळती सुरु होती. ज्या ठिकाणी ही गळती सुरु होती तेथे महावितरणचा ट्रान्स्फार्मर आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीत व्यक्त केली होती.

तसेच पाणीगळतीमुळे परिसरात निर्माण झालेली दलदल आणि घाणीचे साम्राज्य याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.

या तक्रारीची दाखल घेत प्रशासनाने जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या, गुरुवारी या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या पाणीगळतीबाबत स्थानिक जागरूक नागरिक विशाल भोसले यांनी कॅंटोन्मेंट प्रशासनाला अनेकदा माहिती दिली होती. पाणीगळती आणि त्यामुळे परिसराला आलेला बकालपणा, खेळाच्या मैदानाला आलेली अवकळा याबाबत त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते रामेशन यांना या प्रश्नी आवाज उठविण्याचे आवाहन केले होते.

मुख्य जलवाहिनीतून ज्या ठिकाणी गळती होत आहे. तेथे दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होऊन ऐनवेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उद्या, गुरुवारी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. रामस्वरुप हरितवाल -मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.