Pimpri News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 9 कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखाचे धनादेश वाटप

एमपीसी न्यूज – कोरोनाशी लढताना मृत्यु झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 9 कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयाचे धनादेशाचे वाटप महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) करण्यात आले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, भाजप शहर महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे आदी उपस्थित होत्या.

महापौर माई ढोरे म्हणाल्या अचानक उद्भवलेल्या कोरोना विषाणु संसर्गामुळे देशात लाखो जणांचा मृत्यू झाला. महानगरपालिकेतील काही कर्मचारी बंधु भगिनींचा देखील कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचा-यांच्या वारसास 25 लाख इतकी मदतीची रक्कम देण्यात आली. वारसांनी या रकमेचा मुलांचे शिक्षण व भविष्य घडविण्यासाठी वापर करावा.

महानगरपालिकेच्या वतीने 9 मयत कर्मचा-यांच्या वारसांना आज धनादेश प्रदान करण्यात आले. त्यामध्ये अकबर सय्यद, वाहन चालक – नागरवस्ती विकास योजना, रमेश जगताप, मुकादम – ह क्षेत्रीय आरोग्य, राजेंद्र तुपे, सहाय्यक शिक्षक – माध्यमिक, काळुराम नलावडे, शिपाई – बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम, विनायक फापाळे, मुख्य लिपिक – ड क्षेत्रीय कार्यालय, अलका साळवे, स्टाफनर्स – वायसीएम रुग्णालय, मोहन डिगोळे, लिपिक – नागरवस्ती विकास योजना, रामदास राखपसरे, सफाई कामगार – ब क्षेत्रीय आरोग्य आणि पंडीत कुटे, प्लंबर – क क्षेत्रीय आरोग्य यांच्या वारसांना महानगरपालिकेने धनादेश सुपुर्द केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.