Pimpri news: माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी शंकर वाल्हेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे

_MPC_DIR_MPU_II

तानाजी वाल्हेकर 1997 मध्ये महापालिकेवर निवडून आले होते. वाल्हेकरवाडी प्रभागाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.

एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारदरम्यान अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.