Pimpri News : सोशल मीडियावरून विनयभंग करणाऱ्या मित्राला अटक  

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला भेटायला बोलावून त्याचे फोटो काढून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. (Pimpri News) महिलेने आरोपीस भेटण्यासाठी नकार दिला असता महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. याबाबत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सन 2020 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत आकुर्डी रेल्वे स्टेशनयेथे घडली.

अतुल निरंजन यादव (वय 31, रा. जमेथा, जि. जोनपूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी (Pimpri News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dighi News : दिघी येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,तीन महिलांची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आरोपीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. अतुल याने फिर्यादीच्या फोटोचे स्क्रिनशॉट काढून तिला वारंवार भेटण्यासाठी बोलावले. फिर्यादीस इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपवर मेसेज करून खासगी फोटो आणि शरीरसुखाची मागणी केली. अतुल याने फिर्यादीचा वारंवार पाठलाग करून तिला आकुर्डी रेल्वे स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले. फिर्यादी भेटण्यासाठी आली नाही तर तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत आरोपीने शिवीगाळ केली. निगडी पोलीस (Pimpri News) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.