Pimpri News : जिम चालक अर्थिक विंवचनेत, जिम सुरु करण्यास परवानगी द्या; खासदार बारणे यांची ‘सीएम’कडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बंद ठेवलेल्या  जिम अद्यापही बंदच आहेत. जिम चालक अर्थिक विंवचनेत सापडले आहेत. त्यांना जागेचे भाडे, वीज बिल भरणे देखील शक्य होत नाही. अनेक जिम चालक तरुण आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करून ‘अनलॉक’मध्ये जिम पुन्हा चालू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

सात महिन्यांपासून जिम व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जिम चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. अनलॉकमध्ये पुन्हा जिम व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची त्यांची मागणी आहे. शहरातील जिम चालकांच्या संघटनेने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रविवारी (दि.4) भेट घेतली. जिम चालू करण्याबाबत निवेदन दिले. सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. खासदार बारणे यांनी जिम चालकांचे प्रश्न समजून घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून जिम चालकांची व्यथा मांडली आहे.

कोरोना काळात अनेक व्यवसायावर बंदी घातली होती. टप्याटप्प्याने ती उठविण्यात आली. मात्र, जिम चालू करण्यावरील बंदी अद्याप उठविण्यात आली नाही. अनेक तरुण जिम चालक आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिम चालकांना जागेचे भाडे, विज बील भरणे देखील शक्य होत नाही. अनेकजण बेरोजगार झाले आहेत.

अनलॉकमध्ये राज्यात अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट देखील सुरू झाले आहेत. मात्र, जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. जिम चालकांनी माझी भेट घेऊन त्यांच्या व्यथा आपल्यापर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती. सर्व परिस्थितीतीचा विचार करून जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी. जिम चालकांना दिलासा द्यावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.