Pimpri News : अपक्ष उमेदवार प्रा. संतोष फाजगे यांनी घेतल्या शिक्षक मतदारांच्या गाठी-भेटी

एमपीसी न्यूज – विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातील पिंपळेगुरव येथील अपक्ष उमेदवार प्रा. संतोष फाजगे यांनी जिल्ह्यातील मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या आहेत. त्यांना पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यांच्या समावेश येत असलेल्या शिक्षक मतदारसंघातून प्रा. संतोष फाजगे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिक्षक मतदारसंघात एकूण 71 हजार 973 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 32 हजार 201 मतदार पुणे जिल्ह्यात आहेत.

प्रा. फाजगे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये गेली 30 वर्षे अध्यपनाचे कार्य केले आहे.

2010 पासून शिक्षक संघटनेच्या माध्यमातून ते शिक्षकांसाठी काम करतात. शिक्षकांचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी संघटीत शक्तीचा सामुहिक प्रयत्नांची व त्याला बळ देण्यासाठी विधीमंडळात चळवळीतील शिक्षकाला प्रतिनिधी म्हणून निवडण्याची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील शिक्षक पसंती क्रमांक एकचे मत देवून केलेल्या कामाची पावती देतील.

विधानपरिषदेत शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची संधी देतील, असा विश्वास प्रा. फाजगे यांनी व्यक्त केला आहे. त्यांना पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.