Fire Fighting’ System : ‘फायर फायटिंग’ यंत्रणेची देखभाल; 47 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय (Fire Fighting’ System) इमारतीत बसविण्यात आलेल्या ‘फायर फायटिंग’ यंत्रणेचे चालन देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी 47 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची पिंपरीत चार मजली प्रशासकीय इमारत आहे. महापालिका मुख्य इमारतीत विविध विभागांचे अधिकारी, तसेच महापौर व इतर पदाधिकारी यांच्यासाठी दालने आहेत. इमारतीमध्ये एकूण तीन मजले अधिकाऱ्यांच्या दालनांसाठी आहेत, तर इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. या इमारतीत महापालिकेच्या अन्य क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांची दररोज ये- जा असते. याशिवाय नागरिकांचीही विविध कामांसाठी वर्दळ असते. त्यामुळे महापालिका मुख्य इमारतीचा परिसर नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो.

PCMC News: गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास आता मुदतवाढ नाही

इमारतीमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास (Fire Fighting’ System) नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. या ‘फायर फायटिंग’ यंत्रणेच्या चालन देखभाल-दुरूस्तीचे काम नियमितपणे करावे लागते. या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार ‘श्री वेंकटेश्वरा टर्नकी प्रोजेक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ठेकेदाराने 47 लाख दोन हजार रुपये असा लघुत्तम दर सादर केला. हा दर अंदाजपत्रकीय 54 लाख 39 हजार रुपयांपेक्षा 13.56 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे तो स्वीकृत करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.