Pimpri News : मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्त दुर्गम गावांना मदत

एमपीसी न्यूज – कासारवाडी मधील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्त दुर्गम गावांना मदत देण्यात आली आहे. “एक हात कर्तव्याचा” या उपक्रमातुन शनिवारी (दि.07) ही मदत त्याठिकाणी जाऊन प्रतिष्ठानच्या वतीने डोंगराळ भाग सडे शिंदे, कोड आणि बौद्धवाडी या दुर्गम भागात मदत पोहचवली.

याठिकाणी 190 धान्यकिट त्यात तांदूळ, तूरडाळ, तेल, पीठ, मिरची पावडर, हळद, साखर, चहा पावडर, बिस्कीट, तसेच 150 पाण्याची बाटली बॉक्स अशा जीवनावश्यक गोष्टी देण्यात आल्या. तसेच पोलादपूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून 75 पाणी बॉक्स गरजू लोकांपर्यंत पोहचवले.

भारतीय योग संस्थान, नवचैतन्य हास्य योग परिवार, समर्थ प्रतिष्ठान आणि सर्व ज्ञात अज्ञात दानशूर व्यक्तींनी यासाठी योगदान दिले.

उपक्रमास मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल दौंडकर, अजय शिंदे, चेतन मेस्ता, विवेक कन्नल्लु, गजानन धावडे, अक्षय पारख, शिवदत्त यादव, नवीन सोनावणे, अनिकेत कडदेकर, जयदीप साने, यशवंत गंभीरे, दर्शन धावडे, तेजस पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.