Pimpri News: महापालिका इमारती, रुग्णालये, दवाखान्यांचे होणार इलेक्ट्रीक व फायर सेफ्टी ऑडिट

भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सल्लागाराची नेमणूक

एमपीसी न्यूज – भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व इमारती, रुग्णालये, दवाखान्यांचे इलेक्ट्रीकल, फायर सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. यासाठी मुंबईतील एफएलस इंजिनिअरिंग या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला ( SNCU ) लागलेल्या आगीत दहा चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाला. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेची मुख्य इमारत, सर्व प्रभाग कार्यालये, सर्व रुग्णालये, दवाखाने, कर संकलन कार्यालये, नाट्यगृह यांचे इलेक्ट्रीक, फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करणे आवश्यक आहे.

या इमारतींचे ऑडिट करण्यासाठी आएस स्टॅन्डर्ड, बिल्डींग कोड इत्यादीचा सारासार विचार करुन संपूर्ण माहिती असलेले निष्णात सल्लागार नेमण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या मार्फत सर्वसमावेशक इलेक्ट्रीकल आणि फायर सेफ्टी ऑडिट करण्याकामी डीपीआर बनविणे, ऑडिट कामकाजावर नियंत्रण ठेऊन ते योग्य प्रकारे करुन घेण्यासाठी महापालिका संकेतस्थळावर कोटेशन नोटीस प्रसिद्ध केली होती. सल्लागार नेमण्यासाठी प्रेझेंटशनसाठी विविध एजन्सींना 9 फेब्रुवारी 2021 रोजी बोलविण्यात आले होते.

मुंबईतील एफएलस इंजिनिअरिंग या एजन्सीने दिलेल्या सादरीकरण पहाणी, मुलाखतीच्या अनुषंगाने आणि एजन्सींनी सादर केलेल्या तांत्रिक पात्रता, कामाचा अनुभव, अनुषंगिक माहिती याचा विचार करता एफएलस इंजिनिअरिंग या सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे.

महापालिका कार्यालये, अनुषंगिक आस्थापना यांच्या इलेक्ट्रीकल आणि फायर सेफ्टी ऑडिट कामाकरिता तसेच ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटीनुसार व शिफारसीनुसार त्यापुढील कामकाजाकरिता आवश्यक ती तांत्रिक उपाययोजना करणे, यंत्रणा उभारण्यासाठी एफएलस इंजिनिअरिंग या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.