Pimpri News: ‘पीसीएनटीडीए’चे सीईओ बन्सी गवळी यांची बदली

एमपीसी न्यूज –  पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांची बदली करण्यात आली आहे.

अमरावती-अकोला जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष पदावर गवळी यांना बढती मिळाली आहे. सहा महिन्यांतच त्यांची बदली झाली आहे.  पीसीएनटीडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून 1 जुलै रोजी बन्सी गवळी यांची नियुक्ती झाली होती.

त्यांची बढती सरकारकडे प्रलंबित होती. त्यानुसार, गवळी यांची बदली  झाली असून अमरावती-अकोला जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे. मात्र, पीसीएनटीडीएवर नवीन सीईओ नियुक्त न झाल्याने गवळी यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.