Pimpri News : राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाची सुवर्णासह पाच पदकांची कमाई

एमपीसी न्यूज – राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघाने तिहेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तसेच वैयक्तिक प्रकारात चार पदके पटकावली आहेत. हे सर्व हेवन स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आहेत.

महाराष्ट्र हौशी जिम्नास्टीक संघटनेतर्फे 21 व्या राज्य स्तरीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 5 व 6 मार्च या कालावधीत जळगाव येथे ही स्पर्धा पार पडली.
पिंपरी चिंचवड संघातर्फे हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला.

14 वर्षाखालील गटात तिहेरी प्रकारात हेवनच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. यात परीजा क्षीरसागर, अनुष्का लुणावत व अनवी पाटील यांनी आपले सादरीकरण केले.

वैयक्तिक प्रकारात 11 वर्षाखालील वैयक्तिक मुली – श्रीष्टी खोडके ( रौप्य ), 14 वर्षाखालील वैयक्तीक मुली – परीजा क्षीरसागर ( रौप्य ), 17 वर्षाखालील वैयक्तीक मुली – वृंदा सुतार ( रौप्य ), खुला गट वैयक्तिक पुरुष – प्रणित आढाव ( कांस्य ) यांनी पदकं मिळवली आहेत. तसेच निधी असबे व मुद्रा चिलात्रे यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

संघाला नियोजन अलका तापकीर तर प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र हौशी जिम्नास्टीक संघटनेचे सचिव मकरंद जोशी, तांत्रिक तज्ञ समितीचे अध्यक्ष अदित्य जोशी, हेवन जिम्नास्टीक अकादमीचे संयोजक चैतन्य कुलकर्णी, अनुभवी प्रशिक्षक मनोज काळे, पिंपरी चिंचवड जिम्नास्टीक संघटनेचे अध्यक्ष संजय मंगोडेकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.