Maval Corona News : नवीन 01 रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.08 ) 01 रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला , तर तालुक्यात दिवसभरात एकही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 17 आहे.

शहरी भागात एकही रूग्ण नाही तर ग्रामीण भागात 01 रूग्ण आज सापडला.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण आज सापडला नाही. आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 32,032 झाली आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण बरा न झाल्याने घरी सोडण्यात आला नाही . मंगळवारी रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे येथे 01 रूग्ण सापडला.असे एकूण 01 रूग्ण सापडला. 31,490 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 11,033 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,091 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,555 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,679 रुग्ण तर ग्रामीण भागात 14,353 रुग्ण आढळून आले आहेत.
एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.31 टक्के आहे तर मृत्यू दर 1.64 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 13 लोणावळा नगरपरिषदमध्ये 00 वडगाव नगरपंचायतमध्ये 00 ग्रामीण भागात 04असे एकूण 17रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

एमपीसी न्यूज पाॅडकास्ट | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा | पाॅडकास्ट ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.