Pune Corona Update : शहरात नवीन 137 कोरोना रुग्णांची नोंद; 120 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमालीची घसरली आहे. शहराच्या विविध भागातील 137 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 61 हजार 198 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 637 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 137 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 02 हजार 604 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 45 लाख 08 हजार 626 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख सध्या उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज पाॅडकास्ट | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा | पाॅडकास्ट ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.