Pimpri News : म्हाळुंगे, पिंपरीत गुटखा विक्री प्रकरणी कारवाई, मुद्देमालासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – म्हाळुंगे, पिंपरीत गुटखा विक्री प्रकरणी दोन कारवाई करण्यात आल्या. म्हाळुंगे येथील कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. तसेच, पिंपरीतील कारवाईत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, 1 लाख 19 हजार 287 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 13 व 14 एप्रिल रोजी ही कारवाई केली.

रेणुका हॉटेल म्हाळुंगे येथे केलेल्या कारवाईत मीनाज जलालउद्दीन ताल्लुकदार (वय 25, रा. रेणुका हॉटेल, म्हाळुंगे, खेड) याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात चाकण (म्हाळुंगे चौकी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनी 8 हजार 193 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी जवळ ठेवला होता.

तसेच, सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरीत कारवाई करत 1 लाख 19 हजार 287 रूपये किंतीचा, गुटखा, रोख रक्कम आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. हितेश जितेंद्र मायारामाणी (वय 24, रा. पिंपरी), सुनिल उर्फ आबु गंगाराम जेसवाणी (वय 55, रा. पिंपरीगाव), राकेश मुलचंद आडवाणी (वय 46, रा. पिंपरीगाव) या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.