Chikhali Crime News : ऐकावं ते नवलंच! रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पो मधून तीन फ्रिज चोरीला 

एमपीसी न्यूज – रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पो मधून तीन फ्रिज चोरीला गेले आहेत. 26 ते 28 मार्च 2022 रोजी त्रिवेणी नगरकडे जाणा-या रस्त्यावर कृष्णानगर, चिखली येथे ही घटना घडली. 

याबाबत कमलाकर अगंत इंगले (वय 29, रा. म्हेत्रे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो (एम एच 04 जे यु 6866) त्रिवेणी नगरकडे जाणा-या रस्त्यावर कृष्णानगर, चिखली येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने टेम्पोचा दरवाजाचे कुलूप तोडून, ट्रकमधून 75 हजार किंमतीचे तीन फ्रिज चोरी केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.