Bhosari News: भोसरीमध्ये सोमवारी बैलगाडा शर्यत, मंगळवारी कुस्तीच्या स्पर्धा

एमपीसी न्यूज – सालाबादप्रमाणे यावर्षीचा भोसरीतील श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव सोमवारी (दि.18) आणि मंगळवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सोमवारी सकाळी 6 वाजता श्रीं ची पूजा, दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत बैलगाडा शर्यती, (बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन वाटप रविवारी ( दि. 17 ) सकाळी नऊ ते बारा भोसरीतील श्री भैरवनाथ मंदिरात होणार आहे.

सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता लोकनाट्य तमाशा, सायंकाळी 7.30 ते रात्री 10 पर्यंत श्रीं च्या पालखीची मिरवणूक आणि ढोल ताशांचे खेळ आयोजित करण्यात आले आहेत तसेच मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 12 लोकनाट्य तमाशाची हजेरी, सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत श्री भैरवनाथ मंदिर मध्ये चक्री भजनाचा कार्यक्रम आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल अशी माहिती भोसरीतील श्री भैरवनाथ मंदिर उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.